लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही महायुती आणि मविआमध्ये उमेदवारीवरून तिढा निर्माण झालाय. आघाडी आणि युती दोन्हींकडेही पक्षांची संख्या जास्त असल्याने इच्छुकांची गर्दी ही मोठी आहे त्यामुळे एक तिढा सुटत नाही तोच दुसरा तिढा निर्माण झाला
vidhan parishad election maharashtra 2024
विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झालाय… दोन्हीकडून इच्छुकांनी दावे ठोकल्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय.. मविआतील पक्षांना विचारात न घेताच उद्धव ठाकरेंनी मुंबई शिक्षक आणि पदवीधरचे उमेदवार जाहीर केल्याची टीका होतेय.
उद्धव ठाकरेंनी मुंबई पदवीधरमधून अनिल परब आणि मुंबई शिक्षकमधून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केलीय. मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रा. प्रकाश सोनावणे इच्छुक आहेत. मविआचा मित्रपक्ष समाजवादी गणराज्य पक्षही मुंबई शिक्षक मतदारसंघातून लढण्यावर ठाम आहे. सुभाष मोरे हे कपिल पाटलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाचे उमेदवार असतील.
काँग्रेस आणि शरद पवार गट उद्धव ठाकरेंवर नाराज
vidhan parishad election maharashtra 2024 विधान परिषद निवडणूक उमेदवारीवरून मविआतही बिघाडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळतेय. ठाकरे गटाने मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो.अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केलीय. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात मविआतील मित्र पक्षांची कोणतीही संयुक्त बैठक झालेली नसताना उमेदवारी जाहीर करण्याची घाई का? काँग्रेस आणि शरद पवार गटातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनसेनं भिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केल्यानं महायुतीतही तिढा
vidhan parishad election maharashtra 2024 दुसरीकडे महायुतीमध्येही काही वेगळी परिस्थिती नाहीय. महायुतीत मुंबई पदवीधरची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडेच राहणार असल्याचं सांगत डॉ.दीपक सावंत यांनी दावा केलाय. तर भाजपही ही जागा लढण्यासाठी आग्रही आहे. महायुतीमध्ये नव्यानेच सामील झालेल्या मनसेनंही कोकण पदवीधरमधून अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केल्यानं महायुतीतही तिढा निर्माण झालाय. भाजपही ही जागा लढण्यासाठी आग्रही असल्याने उमेदवारीचा पेच सोडवण्यासाठी प्रमुख नेत्यांचा कस लागणार आहे
1 thought on “vidhan parishad election maharashtra 2024 : विधान परिषद निवडणुकीवरून जुंपली; चार जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा”