Central Govt Employees:केंद्रीय कर्मचाऱ्यांची होळी होणार गोड, महिन्याच्या शेवटी खात्यात जमा होणार लक्ष्मी

Spread the love
Central Govt Employees:

देशभरात होळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला. २५ मार्च आणि २६ मार्च होळी देशातील वेगवेगळ्या राज्यात होळी साजरी केली गेली मात्र, केंद्रीय कर्मचाऱ्यांची खरी होळी तर येत्या आठवड्यात होणार आहे. होळी रंग आणि आनंदाचा सण आहे आणि आता यंदाची होळी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी खास असणार आहे

या होळीच्या निमित्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट मिळणार आहे. २५ मार्चला देशभरात होळीचा (धुळवड) सण साजरा केला गेला असला, तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांची खरी होळी ३० मार्चला होणार आहे. या दिवशी, केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळेल, ज्यामध्ये महागाई भत्ता (DA), थकबाकी आणि घरभाडे भत्ता (HRA) मध्ये वाढ यासारख्या गुड न्यूज मिळतील.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पगार आणि भता

आर्थिक वर्ष तसेच मार्च महिन्याचा शेवटचा दिवस, ३१ मार्च, रविवार असल्यामुळे केंद्रीय पगार ३० मार्च रोजी खात्यात हस्तांतरित केला जाईल असे अपेक्षित आहे. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ३१ मार्च रोजीही काही विशेष बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहे. ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे आरबीआयने बँकांना शाखा सुरू ठेवण्यास सांगितले आहे.तरी सर्व बँक चालू राहतील.

Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती टक्के नी वाढला.

महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ४ टक्क्यांनी वाढवला, ज्यामुळे एकूण महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर गेला. वाढीव महागाई भत्ता १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार आहे, त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीची थकबाकीही मिळेल. म्हणजे मार्चच्या पगारात दोन महिन्याच्या थकबाकीव्यतिरिक्त वाढीव डीएची देखील भर पडेल.

Central Govt Employees: HRA लाभ किती टक्के न मीळेल (घरभाडे भत्ता) ही वाढेल

दरम्यान, महागाई भत्ता वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ताही वाढणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४% वाढल्यामुळे घरभाडे भत्ताही वाढला असेल आणि शहरांच्या श्रेणीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३०% पर्यंत एचआरएचा लाभ मिळेल. याशिवाय मार्च महिन्याच्या पगारात इतर भत्तेही जोडले जातील.


  • मार्चच्या पगारापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव DA जमा होईल
  • अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.
  • तथापि, मूळ वेतनामध्ये ५०% DA विलीन करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.

 केंद्र सरकारचे कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून वाढीव महागाई भत्त्याच्या (DA) प्रतीक्षेत होते जी अखेरीस संपुष्टात आली. मार्च महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA आणि पेन्शनधारकांची महागाई सवलत (DR) ४ टक्क्यांनी वाढून देण्यात आली. यासह आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए एकूण ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. परंतु, महागाई भत्ता वाढला असला तरी खात्यात कधी जमा होईल हे जाणून घेण्यास कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यावर्षी १ जानेवारीपासून DA मूळ वेतनाच्या ४६% नव्हे तर ५०% दराने दिला जाईल आणि मार्च महिन्याच्या पगारापासून वाढीव महागाई भत्ता खात्यात जमा होईल. म्हणजे पुढील महिन्याच्या २ तारखेला मिळणारा पगार नवीन दरानुसार डीएच्या अधीन असेल.

Central Govt Employees पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली र्निणय.

गेल्या आठवड्यात ७ मार्च २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा _ जानेवारी आणि जुलै – सुधारित करते. अशा प्रकारे मार्चमध्ये वाढवण्यात आलेला महागाई भत्ता १ जानेवारी २०२४ पासून लागू होईल.

Central Govt Employees: DA विलीनीकरणाबाबत अद्याप निर्णय नाही

Central Govt Employees:अर्थ मंत्रालयाकडून नुकतंच जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. तसेच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार महागाई भत्ता ५०% झाला तर मूळ वेतनात विलीन केला जाईल. तसेच मूळ पगार वाढला की एचआरए, ग्रॅच्युइटी, चिल्ड्रन एज्युकेशन-ट्रान्सपोर्ट अलाऊन्स इत्यादीही वाढतील.

अलीकडसह केंद्र सरकारने महागाई भत्त्यात (DA) ४ टक्क्यांपर्यंत वाढ केली, त्यामुळे आता महागाई भत्ता ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. या वाढीसह केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या टेक-होम सॅलरी पॅकेजमध्ये वाढ होण्याची खात्री आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार एचआरए वाढीसाठी शहरांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

Central Govt Employees: केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यावर्षी १ जानेवारीपासून DA मूळ वेतनाच्या ४६% नव्हे तर ५०% दराने दिला जाईल आणि मार्च महिन्याच्या पगारापासून वाढीव महागाई भत्ता खात्यात जमा होईल. म्हणजे पुढील महिन्याच्या २ तारखेला मिळणारा पगार नवीन दरानुसार डीएच्या अधीन असेल.

Leave a Comment