Legislative Council Elections मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण शिक्षक आणि नाशिक पदवीधर या चार जागांसाठी मतदान होणार आहे.
Legislative Council Elections
Legislative Council Elections लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील 5 टप्पे संपल्यानंतर आता पदवीधर निवडणुकांसंदर्भात अपडेट देण्यात आली आहे. राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालीय. 26 जूनला 4 जागांसाठी मतदान होणार आहे तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण शिक्षक आणि नाशिक पदवीधर या चार जागांसाठी मतदान होणार आहे
आधी या ठिकाणी 10 जून रोजी मतदान होणार, ही तारीख जाहीर करण्यात आली होती. दरम्यान काही दिवसांपुर्वीच या तारखा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली होती. दरम्यान आता निवडणूक आयोगाकडून अपडेट वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे
पदवीधर, शिक्षक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे. महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर, शिक्षक कार्यकाळ 7 जुलै रोजी संपत आहे. मुंबई पदवीधर सदस्य विलास पोतनीस, कोकण पदवीधर निरंजन डावखरे, नाशिक विभाग किशोरी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील यांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपुष्टात येतोय.
Legislative Council Elections पदवीधर, शिक्षक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे. महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर, शिक्षक कार्यकाळ 7 जुलै रोजी संपत आहे. मुंबई पदवीधर सदस्य विलास पोतनीस, कोकण पदवीधर निरंजन डावखरे, नाशिक विभाग किशोरी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील यांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपुष्टात येतोय.
राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांच्या समावेशाचा प्रस्ताव
राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम आराखड्यात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेसह मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्यात आला आहे
Maharashtra State Board
मूल्य आणि स्वभाववृत्ती या शीर्षकाखाली मनुस्मृतीतील श्लोकाचा संदर्भ देण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा एससीईआरटीनं जाहीर केला आहे.
देशातील पारंपरिक, प्राचीन ज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करुन देण्यासाठी ज्ञानप्रणाली विषयाचा समावेश करण्यात आला आहे. यात मनुस्मृतीतील श्लोकाचा संदर्भ देण्यात आला आहे
नेमका प्रस्ताव काय ?
राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांच्या शिक्षण आराखड्यामध्ये भगवत गीता, मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे. यावरुन राजकीय वाद-प्रतिवाद सुरु झाले आहेत. नव्या शिक्षण आराखड्यामध्ये प्राचीन ज्ञानवारसा जपूया या या मथळ्याखाली पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव आहे.
याअंतर्गत 1 ते 25 मनाचे श्लोक हे इयत्ता तिसरी ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत पाठांतरासाठी असतील. तसेच 25 ते 50 क्रमांकाचे मनाचे श्लोक हे इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी असतील.
त्याचप्रमाणे भगवदगीतेचा अध्याय 12 वा 9 व्या इयत्तेपासून 12 व्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी असेल, असा प्रस्ताव आराखड्यात आहे. तसेच मूल्ये आणि स्वभाववृत्तीच्या अध्ययनासाटी मनुस्मृतीमधील श्लोकांचासमावेश केल्याचं आराखड्यात दिसत आहे. हा एकूण 336 पानांचा आरखडा आहे. या आराखड्यावर आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.
1 thought on “Legislative Council Elections राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर”