Maharashtra Weather News Latest: मान्सूनच्या वाऱ्यांनी व्यापला देशाचा बहुतांश भाग राज्याच्या ‘या’ भागात वादळी पावसाचा इशारा

Spread the love

Maharashtra Weather News Latest: सोसाट्याचा वारा आणि वादळी पाऊस. राज्याच्या कोणत्या भागासाठी दिला हा इशारा? मुंबईकरांनो तुम्हीही वाचा हवामान वृत्त

Maharashtra Weather News Latest:

अंदमान निकोबार बेटांवर पोहोचलेल्या मान्सूननं (Monsoon) आता देश व्यापण्यास सुरुवात केली असून, मान्सूचे हे वारे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील हवामानावरही परिणाम करताना दिसत आहेत. सध्या मान्सूनचा एकंदर वेग पाहता देशासह राज्याच्या काही भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Weather News Latest: उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. तर, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगर भागामध्ये अधूनमधून सूर्य झाकोळणार असून, काही भागांमध्ये उकाडा अधिक जाणवेल. सायंकाळच्या वेळी आभाळात पावसाळी ढगांचा खेळ पाहायला मिळू शकतो.

मागील 24 तासांमध्ये हवामानाची काय स्थिती? आहे

Maharashtra Weather News Latest:
Credit by Times of india

Maharashtra Weather News Latest: बुधवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पुन्हा एकदा चिपळूण तालुक्याला झोडपून काढलं. डेरवणमध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय. काजरकोंड गावात घरावरील पत्र उडून गेले, तर अनेकांच्या घरांवर झाडं पडल्यामुळे घरांचं नुकसान झालं

Maharashtra Weather News Latest: तिथं यवतमाळ जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस बरसला. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात धुवांधार पाऊस झाल्याने अनेक वृक्ष उन्मळून पडली. तर अनेक घरांवरील टीनपत्रे उडाले. मोठ्या प्रमाणात आंबा, भाजीपाला पिकांसह ज्वारी आणि तीळ पिकाला फटका बसला.

उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होणार? निवडणूक आयोगाने दिले ‘त्या’ पत्रकार परिषदेच्या चौकशीचे आदेश

मतदाना दिवशीची उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद निवडणूक आयोग तपासणार आहे. भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगासह भाजपला टार्गेट केल्याची तक्रार भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

Credit by Lokmat

केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद निवडणूक आयोग तपासून पाहणार आहेत. यात काही वादग्रस्त असेल तर उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई, ठाणे, नाशिकसह राज्यातील १३ मतदारसंघात सोमवारी झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली. मतदानासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दृश्य जागोजागी दिसलं. मात्र निवडणूक प्रक्रियेतील संथपणामुळं मतदानासाठी विलंब लागला.

कडक उन्हात तब्बल 4 ते 5 तास मतदार रांगेत तिष्ठत उभे होते. मतदान केंद्रावर पुरेशा सुविधांचा अभाव आणि मतदानाला होणारा उशीर यामुळं कंटाळून अनेकांनी घरी जाणं पसंत केलं. वृद्ध मतदार आणि महिलांना रांगेत उभं राहिल्यानं प्रचंड त्रास झाला.

Maharashtra Heat wave: महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

1 thought on “Maharashtra Weather News Latest: मान्सूनच्या वाऱ्यांनी व्यापला देशाचा बहुतांश भाग राज्याच्या ‘या’ भागात वादळी पावसाचा इशारा”

Leave a Comment