Marathi News Maharashtra पुढील पाच दिवसांत केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे

Spread the love

यंदा ३१ मेपर्यंत मान्सूनचे आगमन केरळमध्ये होईल, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सोमवारी (२७ मे) सांगितले

Marathi News Maharashtra

Marathi News Maharashtra नैर्ऋत्य मोसमी वारे हळूहळू पुढे सरकत आहेत. पुढील चार दिवसांत केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदा ३१ मेपर्यंत मान्सूनचे आगमन केरळमध्ये होईल, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सोमवारी (२७ मे) सांगितले.

त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीतून तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जूनमध्ये काही दिवसांनी पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे. मान्सून ऑनसेट म्हणजे काय? कोणत्या निकषांवर मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली जाते? मान्सून कुठे तयार होतो? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

मान्सून ऑनसेट म्हणजे काय?

भारतात साधारणत: ७० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस नैर्ऋत्य मान्सूनमुळे पडतो. भारतात जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्येकडून म्हणजेच अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वारे वाहतात; ज्यांना नैर्ऋत्य मौसमी वारे किंवा नैर्ऋत्य मान्सून म्हटले जाते. भारताच्या आर्थिक दिनदर्शिकेत मान्सूनचे ज्यादिवशी आगमन होते, त्या दिवसाला फार महत्त्व असते.

Marathi News Maharashtra
Credit to india new

सत्तेत असेपर्यंत शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करु देणार नाही

Marathi News Maharashtra असे अजित पवार यांनी मनले आहे

छगन भुजबळांना आवरा, नायतर… निलेश राणे

कोरोनानंतर आणखी एक रोग येणार- WHO

Heat Wave : विदर्भावर सूर्याचा प्रकोप

Marathi News Maharashtra मॉन्सूनचे आगमन तोंडावर आले असतानाच देशाच्या वायव्य आणि मध्य भागात तीव्र उन्हाळा अनुभवायला मिळत आहे. विदर्भातही सूर्याचा प्रकोप कायम असल्याने ब्रह्मपुरी येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४७.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. २९) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे

Marathi News Maharashtra राज्यात उन्हाचा चटका कायम असल्याने मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट आली.

ब्रह्मपुरी येथे हंगामातील उच्चांकी ४७.१ अंश तापमान नोंदले गेले आहे. तेथे २६ मे २०१० रोजी आतापर्यंतच्या उच्चांकी ४८.३ अंश तापमानाची नोंद झाली होती.

Marathi News Maharashtra नागपूर, वर्धा, अमरावती येथे तापमान ४५ अंशांपार पोहोचले. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा येथे ४४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पश्‍चिमेकडील वारे आणि अरबी समुद्रावरील बाष्पामुळे ढगाळ हवामान झाल्याने कोकण मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे

आज (ता. २९) विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाट येण्याचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका-कमी अधिक होण्याची शक्यता आहे

Marathi News Maharashtra कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरातील ‘रेमल’ तीव्र चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर ओसरून गेले आहे. मंगळवारी (ता. २८) ईशान्य भारतातील राज्यांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते.

Planet Research : गुरूपेक्षा मोठा, तरिही अत्यंत हलका ग्रह

युरोपातील खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या सूर्यमालेतील गुरू या ग्रहापेक्षा आकाराने ५० टक्के मोठा आणि त्याच वेळी अत्यंत कमी घनतेचा ग्रह शोधला आहे. त्याचे नाव WASP-193b असे ठेवले आहे. मोठा आकार आणि तरीही अत्यंत कमी घनता यामुळे आपल्या खाण्याच्या ‘बुढ्ढी के बाल’ (इंग्रजीमध्ये – कॉटन कॅण्डी) सारखा रंगबिरंगी दिसतो. अर्थात, या ग्रहामुळे आजवरच्या ग्रह निर्मितीच्या सिद्धांताना आव्हान मिळाले आहे.

त्याविषयीची माहिती १४ मे रोजी प्रकाशित ‘जर्नल नेचर अॅस्ट्रॉनॉमी’ मध्ये देण्यात आली आहे. या अभ्यासामध्ये ‘एमआयटी’ मधील ज्युलियन डे विट (सहाय्यक प्रोफेसर), आर्टेम बुर्दानोव्ह (पोस्ट डॉक संशोधक) यांचा समावेश असून, युरोपमधील वेगवेगळ्या खगोल संशोधन संस्थांची मदत झाली आहे.

पृथ्वीपासून १२३२ प्रकाश वर्षे इतक्या दूर अंतरावर असलेल्या ‘वास्प १९३’ या ताऱ्याजवळ २००६, २००८ आणि २०११ ते २०१२ या काळात केलेल्या खगोलीय सर्वेक्षणामध्ये (Wide Angle Search for Planets यावरूनच WASP असे नाव देण्यात आले आहे.) वास्प १९३ बी हा ग्रह सापडला. या ग्रहामुळे प्रकाश अडवला गेल्याने ‘वास्प १९३’ हा तारा प्रत्येक ६.२५ दिवसांनी पृथ्वीवरून दिसत नाही.

आकाराने इतका मोठा ग्रह जर ताऱ्याच्या जवळ असेल, त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ताऱ्याच्या प्रकाशामध्ये काही वक्रता निर्माण होते. या वक्रतेच्या प्रमाणावरून ग्रहाच्या वस्तुमानाचा अंदाज खगोलशास्त्रज्ञ मिळवत असतात. अशी वक्रता या ग्रहामुळे होताना दिसत नव्हती. त्यामुळे ‘रॅडीयल व्हेलॉसिटी’ पद्धतीने त्याच वस्तुमान काढण्याचा प्रयत्न करूनही उत्तर मिळत नव्हते. ते शोधण्यासाठी संशोधकांना सतत चार वर्षे माहिती गोळा करावी लागली.

त्यातून मिळत असलेली घनता ही इतकी कमी होती, की शास्त्रज्ञांचा विश्‍वासच बसत नव्हता. शेवटी हा ग्रह खरोखरच वजनाने अत्यंत हलका असल्याचे मान्य करण्यात आले. त्यांनी या ग्रहाचे काढलेले वस्तुमान हे गुरू ग्रहाच्या ०.१४ टक्का इतकेच होते. ‘वास्प १९३ बी’ या ग्रहाची घनता प्रति घन सेंटिमीटरसाठी ०.०५९ ग्रॅम इतकीच आली आहे. (तुलनेसाठी ः गुरू ग्रहाची घनता १.३३ ग्रॅम प्रति घन सेंटिमीटर असून, पृथ्वीची घनता ५.५१ प्रति घन सेंटिमीटर इतकी आहे.) या ग्रहावर घन पदार्थांऐवजी हायड्रोजन आणि हेलियम या सारखे केवळ हलके वायू असण्याची शक्यता आहे.

Maharashtra news : हार्दिक पांड्या घटस्फोटाच्या अफवांदरम्यान नतासा स्टॅनकोविक म्हणाली ‘देवाची स्तुती करा’

1 thought on “Marathi News Maharashtra पुढील पाच दिवसांत केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे”

Leave a Comment