क्रिकेटपटू, राजकारणी आणि समालोचक अशा तीन खेळपट्ट्या गाजवणारे नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या शैलीत दिसणार आहेत.
पंजाब काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांची समालोचनात एन्ट्री झाल्याने चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला. आपल्या अप्रतिम समालोचनाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांना सामन्यात जिवंत ठेवण्याचे काम करतात. बऱ्याच दिवसांपासून समालोचन आणि टीव्ही शोपासून दूर असलेले सिद्धू प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी परतणार आहेत.
आगामी आयपीएल हंगामातील सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात 22 मार्च रोजी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल.
Navjot Singh Sidhu भारताचे माजी क्रिकेटपटू सिद्धू जे आगामी आयपीएलसह दशकभरानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये परतण्यास तयार आहेत, त्यांनी मंगळवारी एक मोठे विधान केले. ते त्यांच्या मानधनाबद्दल बोलत असताना त्यांनी सांगितले की, आयपीएलमध्ये चांगली खेळी करून आपल्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे आव्हान सर्वच देशातील खेळाडूंसमोर असेल. लक्षणीय बाब म्हणजे सिद्धू म्हणाले की, एका स्पर्धेसाठी 60-70 लाख घेणारा मी आयपीएलमधील एका सामन्यासाठी 25 लाख रूपये घ्यायचो.
भारताचे माजी क्रिकेटपटू सिद्धू जे आगामी आयपीएलसह दशकभरानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये परतण्यास तयार आहेत, त्यांनी मंगळवारी एक मोठे विधान केले. ते त्यांच्या मानधनाबद्दल बोलत असताना त्यांनी सांगितले की, आयपीएलमध्ये चांगली खेळी करून आपल्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे आव्हान सर्वच देशातील खेळाडूंसमोर असेल. लक्षणीय बाब म्हणजे स म्हणाले की, एका स्पर्धेसाठी 60-70 लाख घेणारा मी आयपीएलमधील एका सामन्यासाठी 25 लाख रूपये घ्यायचो.
खरं तर नवज्योतसिंग सिद्धू आगामी काळात स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना दिसणार आहेत.
Navjot Singh Sidhu यांची एन्ट्री 2001 मध्ये भारताच्या श्रीलंका दौऱ्यात सिद्धू यांनी समालोचनाच्या करिअरला सुरुवात केली होती. सिद्धू त्यांच्या विनोदी वन-लाइनर्ससाठी लगेचच प्रसिद्ध झाले. भारतातील क्रिकेट समालोचनातील त्यांच्या योगदानाने अमिट छाप सोडली आहे, ज्यामुळे ते खेळातील सर्वात संस्मरणीय आवाजांपैकी एक बनले.
नवज्योतसिंग सिद्धू यांची बोलण्याची पद्धत प्रेक्षकांना भुरळ घालते. क्रिकेटच्या मैदानातून समालोचन क्षेत्राकडे वळणारे सिद्धू पुन्हा आयपीएलमध्ये समालोचन करणार म्हणजे चाहत्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल. ते आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसणार नाहीत.