RCB vs KKR या दोन्ही संघांनी शेवटचे सामने जिंकले असून आजचा सामना दोघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हा सामना बंगळुरुमध्ये एम. चेन्नस्वामी स्टेडियमवर खेळला जाणार हा सामना महत्वपूर्ण आहे. त्यामुळे येथील खेळपट्टी कशी आहे? टॉस जिंकल्यानंतर काय निवडणं फायद्याचं ठरु शकतं? पाहूयात.
IPL 2024 RCB vs KKR पिच रिपोर्ट :
RCB vs KKR आज एक महत्त्वाचा समाना होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सचा संघासमोर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ मैदनात उतरेल.आणि बंगळुरुमधील एम. चिन्नस्वामी स्टेडियमवर असलेला हि टीम आरसीबीसाठी होम ग्राऊण्डवरील सामना असणार आहे.
आरसीबीचा हा यंदाच्या पर्वातील तिसरा सामना असणार आहे. यापैकी एक सामना आरसीबीने जिंकला असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे केकेआरच्या संघाने एकच सामना खेळला असून त्यामध्ये त्यांनी सनरायझर्स हैदराबादच्या संघाला 4 विकेट्सने पराभूत केलं. दोन्ही संघ विजयी कामगिरी करुन मैदानात उतरणार असल्याने सामना तुरशीचा होईल असं चित्र दिसत आहे. या सामन्यादरम्यान बंगळुरुमधील एम. चिन्नस्वामी स्टेडियमवरील खेळपट्टी कशी आहे आणि येथील आकडेवारी नेमकं काय सांगते पाहूयात.
या स्टेडियम बॉलिंग चालणार का बॅटिंग
RCB vs KKR जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणं फायद्याचं ठरु शकतं. कारण प्रथम फलंदाजी करणारा संघ चेन्नस्वामीच्या मैदानावर विजय मिळवण्याचं प्रमाण ६५ टक्के इतकं आहे. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकण्याची शक्यता ३५ टक्के इतकी आहे. म्हणून नाणेफेक जिंकणार कर्णधार फलंदाजीची निवड करण्याची शक्यता अधिक आहे. येथील सरासरी स्कोअर 198 धावा इतका आहे. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाचा सरासरी स्कोअर 191 इतका असतो. त्यामुळेच आजचा सामना हाय स्कोअरिंग असणार असं चित्र दिसत आहे.आणि या सामन्यत फलंदाजी घेणं फायद्याचं ठरु शकतं.
आजच्या सामान्यच मैदान कस आहे ?
बंगळुरुमधील एम. चिन्नस्वामी स्टेडियम आकाराने फार छोटं आहे. त्यामुळे या मैदानावर गोलंदाज जरा बिचकत बिचकतच गोलंदाजी करतात जास्त चौकार षटकार जाण्याची शक्यता आहे . दुसरीकडे हे मैदान म्हणजे फलंदाजांसाठी अगदी नंदनवन आहे. या मैदानावरील खेळपट्टी अगदीस सपाट म्हणजे फ्लॅट आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी फायद्याची ठरते.
मात्र सामना सुरु होताना वेगवान गोलंदाजांना पहिल्या काही ओव्हरमध्ये खेळपट्टीकडून मदत मिळताना दिसते. त्यामुळेच सावध सुरुवात करणं हे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी फायद्याचं ठरु शकतं. सामन्याच्या सुरुवातीलाच वेगवान गोलंदाजांना विकेट्स घेण्याची संधी असते. मात्र पॉवर प्लेपर्यंत सावधपणे ओव्हर खेळून काढल्यास फलंदाजांचं सामन्यावर वर्चस्व राहतं. मध्यम गती गोलंदाज आणि फिरकीपटू या मैदानावर फारसे प्रभावी ठरत नाहीत. मात्र वेगवान गोलंदाज अखूड टप्प्यावर किंवा यॉर्कर लेंथ गोलंदाजी करत असतील तर विकेट्स मिळण्याची शक्यात अधिक आहे.
या दोन्ही संघानी एकमेकांवरुद्ध किती सामने खेळले ?
मधल्या काही ओव्हर्समध्ये फिरकीपटूंना फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव बनवता आला तर त्याचा फायदाच होऊ शकतो. पण सामन्यपणे या ओव्हर्समध्ये सेट झालेले फलंदाज मोठे फटके मारताना दिसतात. केकेआर आणि आरसबीचे संघ आत्तापर्यंत एकमेकांविरुद्ध 32 सामने खेळले असून त्यापैकी 18 सामने जिकूंन आघाडीवर आहे आणि मध्ये केकेआरने विजय मिळवला असून 14 सामने आरसीबीने जिंकले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ला सातत्याने मजबूत संघ उभे करूनही अद्याप आयपीएल ट्रॉफी मिळवता आलेली नाही. 2020 मध्ये ते प्लेऑफमध्ये पोहोचले होते परंतु एलिमिनेटरमध्ये SRH ने त्यांचा पराभव केला होता. त्यांनी मागील मोसमात प्लेऑफमध्येही सहभाग घेतला परंतु राजस्थान रॉयल्सकडून क्वालिफायर-2 मध्ये पराभव पत्करावा लागला.
याउलट, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने 2012 आणि 2014 मध्ये दोनदा IPL विजेतेपद पटकावले आहे, तरीही त्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. IPL 2023 मध्ये, KKR ने त्यांच्या दोन्ही लीग मीटिंगमध्ये RCB ला खात्रीपूर्वक पराभूत केले, अनुक्रमे 81 धावांनी आणि 21 धावांनी विजय मिळवला.
सामना सुरू होईल तेव्हा बेंगळुरूचे तापमान सुमारे 32 अंश असेल, परंतु सामन्यादरम्यान ते 26 अंशांवर थोडेसे थंड होईल. पावसाची शक्यता नाही आणि आर्द्रता 41% च्या पुढे जाणार नाही.
RCB vs KKR वेळ आणि तारीख पहा
RCB विरुद्ध KKR IPL 2024 हा सामना 29 मार्च रोजी बेंगळुरूच्या एम चिन्नश्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता (IST) खेळला जाईल.
RCB vs KKR IPL 2024: खेळाडूंनी लक्ष द्यावे
आरसीबी: फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक, मोहम्मद सिराज
केकेआर : फिल सॉल्ट, मिचेल स्टार्क, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, श्रेयस अय्यर, नितीश राणा