Weather update Maharashtra News महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 24 तास महत्त्वाचे, IMD कडून हवामानाबाबत मोठी बातमी

Spread the love

Weather update Maharashtra News महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे

Weather update Maharashtra News

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, हवामान विभागाकडून (IMD) महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

Weather update Maharashtra News हवामान विभागाकडून उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे.

दरम्यान दुसरीकडे मराठवाड्यात देखील आज हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नुसता पाऊसच पडणार नसून, वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या काळात महाराष्ट्रात ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहन्याची शक्यता आहे.

Weather update Maharashtra News मुंबईबाबत बोलायचे झाल्यास पुढील 24 तास मुंबई आणि उपनगरात ढगाळ हवामान राहणार असून, सायंकाळच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मुंबईचं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकतं.

राज्याच्या काही भागात अजूनही उष्णतेची लाट आहे. मात्र पुढील दोन ते तीन दिवसांत पाऊस सर्वदूर हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पाऊस पडल्यामुळे अनेक भागात पेरणीपूर्व मशागतीला वेग आल्याचं चित्र आहे, शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Weather update Maharashtra News
Credit To India TV Hindi

कसं पिकवावं… सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला

हिंगोली जिल्ह्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची लागवड केली जाते गेल्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली होती.

Weather update Maharashtra News राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे बळीराजा सुखावला असून आता सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा आहे. तर, दुसरीकडे शेतकरी (Farmer) आता पेरणीच्या कामात व्यस्त होणार असून पहिल्या पावसानंतर पेरणीला सुरुवातही होईल. त्यामुळे, बियाणांची खरेदी करण्यासाठी बळीराजा बी-बीयाणं , खतांच्या दुकानात पाहायला मिळत आहे. मात्र, बियाणांची वाढलेली किंमत पाहून शेतकरी निराश झाल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकांत मराठावाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात चर्चेत ठरलेला सोयाबीन (Soyabin) शेतकऱ्यांचा प्रश्न अद्यापही कायम आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची लागवड केली जाते गेल्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे, शेतकऱ्यांनी शेतामध्ये चांगल्या पद्धतीने सोयाबीनचे उत्पादन घेतले होते, परंतु बाजार भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतामधलं सोयाबीन घरीच ठेवलं होतं. वर्षभर सोयाबीनचा भाव पाच हजारांच्या पुढे कधीच गेला नाही, सध्या हे सोयाबीन चार ते साडेचार रुपये दराने विक्री होत आहे, आता पेरणीची वेळ आली तरही सोयाबीनचा भाव वाढला नसल्याने शेतकरी चिंतातूर आहे. तर, नव्या पेरणीसाठी सोयाबीन बियाणाने चांगलाच भाव खाल्ल्याचं दिसून येत आहे.

शेतकऱ्यांनी शेतामध्ये मशागतीची कामे पूर्ण करून ठेवली आहेत आणि पावसाची वेळ जवळ आल्याने बाजारामध्ये बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु सोयाबीनच्या बियाण्याचे भाव प्रचंड वाढल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या सोयाबीनला 4 हजार रुपये पर क्विंटल भाव मिळतोय, तर सोयाबीनचे बियाणे सात ते दहा हजार रुपये पर क्विंटल दराने खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे बियाण्याचे भाव वाढल्याने शेतात सोयाबीनची पेरणी कशी करायची असाच प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झाला आहे.

सोयाबिन पेरणीची पद्धत

Weather update Maharashtra News सोयाबीनसाठी वापरला जाणारा बियाणे दर हा राखल्या जाणाऱ्या अंतरानुसार सरासरी 16 किग्रॅ – 20 किग्रॅ/एकर असतो. दोन रांगांतील अंतर: 45 ते 60 सेमी तर रोपांतील अंतर: 4-5 सेमी एवढे ठेवण्यात येते. सोयाबीनला चांगला गादीवाफा लागतो ज्याचा पोत बऱ्यापैकी चांगला असेल आणि त्यामध्ये खूप जास्त ढेकळे नसतील. जमीन योग्य सपाट केलेली आणि पेंढा नसलेली असावी. कुळवाच्या नांगराने एकदा खोल नांगरणी करून त्यानंतर स्थानिक नांगराने दोनदा कुळवणी किंवा दोनदा नांगरणी पुरेशी असते. पेरणीच्यावेळी मातीमध्ये चांगला ओलावा असावा लागतो.

वालुकामय चिकणमाती चांगली

Weather update Maharashtra News सोयाबीनची वाढ उष्ण आणि दमट हवामानात चांगली होते. सोयाबीनच्या जातींमध्ये दिवसांची लांबी हा प्रमुख घटक आहे. कारण या कमी दिवसांच्या वनस्पती आहेत. सोयाबीनला चांगला निचरा असलेली सुपीक जमीन लागते जिचा सामू मात्रा 6.0 – 7.5 असेल. मातीचा उत्तम प्रकार म्हणजे वालुकामय चिकणमाती, जिच्यामध्ये सेंद्रिय घटक चांगले असतील. पाणी साठून राहणारी माती सोयाबीन लागवडीसाठी अनुरूप नाही

Monsoon Update मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात, ‘या’ तारखेला मान्सून होणार दाखल

1 thought on “Weather update Maharashtra News महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 24 तास महत्त्वाचे, IMD कडून हवामानाबाबत मोठी बातमी”

  1. Pingback: Rohit sharma

Leave a Comment