HSC SSC Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.
HSC SSC Result बारावीचा निकाल येत्या आठवड्यात
HSC SSC Result महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. बारावीचा निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो
HSC SSC Result दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांना देखील आता दोन्ही परीक्षांच्या निकालाचे वेध लागले आहेत. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर होईल अशी माहिती आहे. तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी जाहीर होऊ शकतो
दहावीचा निकाल कधी जाहीर होणार ?
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासणीचं काम बोर्डाकडून तयार झालं आहे. उत्तर पत्रिका तपासणीचं काम पूर्ण झालं असून आता निकालाच तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
HSC SSC Result महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2023-24 या शैक्षणिक वर्षात वाढली आहे. दहावीला 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान पार पडली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे ,नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर , अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण नऊ विभागीय मंडळांतर्फे परीक्षेचं आयोजन केलं जातं.
थोड्याच वेळात महायुतीच्या प्रचारसभेला सुरुवात होणार
लोकसभा निवडणुकीचा शेवटचा आणि पाचवा टप्प्यासाठी येत्या सोमवारी 20 मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या टप्प्यातील प्रचार आता शिगेला पोहोचला असून आज मुंबईत शिवाजी पार्कवर आज महायुतीची सभा होणार आहे. याठिकाणी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी, राज ठाकरे एकाच मंचावर असणार आहे. दुसरीकडे मुंबईत आज मविआची सभा होणार असून उद्धव ठाकरे, शरद पवार, रमेश चेन्नीथला, पटोले उपस्थित राहणाराय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी दाखल
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आल आहे. त्यांना गळ्याचे इन्फेक्शन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना तापही आहे, त्यामुळे त्यांना पुढील काही दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
1 thought on “HSC SSC Result बारावीचा आणि दहावी चा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, बोर्डाचं काम अंतिम टप्प्यात, दहावीचा निकाल कधी लागणार”