Lok Sabha Election Live Update 2024: महाराष्ट्र खजिना चावी अजित पवारांकडे’ – देवेंद्र फडणवीस

Spread the love

Lok Sabha Election Live Update 2024: महाराष्ट्र खजिना चावी अजित पवारांकडे’ – देवेंद्र फडणवीस

 Lok Sabha Election Live Update 2024:

सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काय चालू आहे ते पहा लागोपाठ दुसऱ्या टप्प्यातही मतदानाची टक्केवारी कमी राहिल्याने अनेक तर्कवितर्क लढवणे सुरु झाले आहे. निवडणुकी संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर


Lok Sabha Election Live Update 2024: रत्नागिरीत महाविकास आघाडीच्या जाहीरसभा झाली .आणि तेथे महाराष्ट्र चे माझी उद्धव ठाकरे उपस्थित होते . आगमन व्यासपीठावर मविआचे उमेदवार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, उपस्थित होते


Lok Sabha Election Live Update 2024: सरकारला लोकसभा, विधानसभा न घेण्याची दुर्बुद्धी होऊ शकते

सासवडच्या सभेतून शरद पवारांनी मोदी-भाजपवर घणाघात करताना भिती व्यक्त केलीय.. मोदी आणि सहकारी ज्या पद्धतीनं देश चालवतायत त्यावर चिंता आहे असं शरद पवारांनी म्हटलंय. उद्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक न घेण्याची दुर्बुद्धी सरकारला सुचू शकते.. अशी भिती शरद पवारांनी व्यक्त केलीय

याचा अर्थ मोदींना महाराष्ट्राची भीती वाटते’- संजय राऊत

Lok Sabha Election Live Update 2024: देश वाऱ्यावर सोडून पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात सभा घेत असतात. मोदी गेल्या 10 वर्षापासून खोटं बोलत आहेत. बघावं तेव्हा मोदी महाराष्ट्रात असतात. याचा अर्थ मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राची भीती वाटते. मोदींच्या अंगात औरगंजेब संचारलाय आहे. एवढचं नाही तर नोटाबंदी आणि लॉकडाऊनमुळे महिलांना मंगळसूत्र विकायला लागलं, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेयं.

Helth Tips: निरोगी राहण्यासाठी ‘या’ पदार्थाचा आहारात समावेश करा

मुंबईतील नाकाबंदीत सापडलं पैशांचं घबाड

लोकसभा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी दक्ष असलेल्या निवडणूक भरारी पथकाकडून शनिवारी रात्री मुंबई उपनगर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. भांडूपमध्ये शनिवारी रात्री निवडणूक भरारी पथकाकडून नाकेबंदी करुन गाड्यांची तपासणी करत असातना सोनापूर सिग्नलवर एका गाडीत मोठ्याप्रमाणावर रोकड आढळून आली. गाडीत आढळून आलेली रक्कम ही जवळपास तीन ते साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे समजते.

ठाणे लोकसभेसाठी ‘हे’ नाव आघाडीवर आहे

ठाणे लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रताप सरनाईक आणि रविंद्र फाटक हे देखिल उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत, असं असताना आता अचानक नरेश म्हस्के यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आल्याची माहीती सूत्रांनी दिली. आज किंवा उद्या शिवसेनेच्या उर्वरीत उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. यावेळी काही नावांमध्ये बदल ही होण्याची शक्यता नाकारतां येत नाही.

प्रचाराचा आज सुपरसंडे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौ-यावर आहेत.. एकट्या माढा मतदारसंघात त्यांच्या तीन सभा होणार आहेत… तर शरद पवारांच्याही शिरूर आणि बारामती मतदारसंघात सभा होणार आहेत.. अजित पवारही आज बारामती दौ-यावर असून सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी मतदारसंघात त्यांचे विविध कार्यक्रम आहेत.. आज कोकणात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या नारायण राणेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची आज प्रचारसभा होणार आहे.. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली दौ-यावर असून महायुतीचे हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत..

1 thought on “Lok Sabha Election Live Update 2024: महाराष्ट्र खजिना चावी अजित पवारांकडे’ – देवेंद्र फडणवीस”

Leave a Comment