Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live महाराष्ट्रातील भाजपाचे विजयी उमेदवार! पाहा संपूर्ण यादी

Spread the love

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट होतंय. शिवसेना-राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे विजयी उमेदवार कोण? यादी पाहा

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates

पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून त्या ठिकाणी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे

नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांना पराभूत केलंय. नितीन गडकारींनी 1,07,926 मतांनी आघाडी मिळवत विजय मिळवला आ

पालघरमध्ये भाजपचे डॉ. हेमंत सावरा विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. सावरा यांनी 147300 अशी निर्णायक मोठी आघाडी घेतली

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतून पीयूष गोयल यांनी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा एक लाखाहून अधिक मताधिक्याने पराभव केला आहे

जळगाव मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या विजयी झाल्या आहे. दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates
Credit To The Economic Times

रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे यांनी हॅट्रिक करत विजय प्राप्त केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील यांचा पराभव केला.

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates त्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाजी मारली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव झालाय.

काँग्रेस सरकार स्थापन करणार का? दमदार कामगिरीनंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया

इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर आता राहुल गांधी यांनी सरकार स्थापनेवर मोठं वक्तव्य केलं आहे.

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates लोकसभा निवडणूक निकालांचा (Lok Sabha Election Result) सध्याचा कल पाहता इंडिया आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसतंय. अनेक राज्यात इंडिया आघाडीने भाजपला टक्कर दिली अन् विजय मिळवला आहे. सध्या आलेल्या कल आणि निकालानुसार सत्ताधारी एनडीएला 300 च्या आत जागा मिळतील आणि भाजपला स्वबळावर सत्ता मिळणार नाही, असं चित्र सध्या तरी दिसतंय.

सत्ताधारी एनडीएला 296 जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडीला जवळपास 228 जागांवर आघाडी मिळतेय. अशातच आता राहुल गांधी यांचं सध्या कौतूक होताना दिसतंय. त्यातच आता निवडणूक निकालानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली

आम्ही फक्त भाजपविरुद्ध लढलो नाही तर स्वतंत्र संस्थाविरोधी देखील लढलो, आम्ही संविधान वाचवण्यासाठी लढतो. संविधान वाचण्यासाठी संपूर्ण जनता एकत्र आली. भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण केलं पण आम्ही एकत्र लढलो. मोदी आणि शहा यांनी यंत्रणांचा गैरवापर केला पण इंडिया आघाडीने देशाला नवा दृष्टीकोन दिलाय.

मोदींचा पराभव म्हणजे अदानींचा पराभव. लोकशाही वाचवण्याचं काम देशातील सर्वात गरिब लोकांनी केलं आहे. लोकांनी या निकालामधून मोदी आणि शहा यांना संदेश दिला आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates सरकार स्थापन करणार का? असा सवाल जेव्हा राहुल गांधी यांना विचारला गेला तेव्हा आम्ही मित्रपक्षांशी चर्चा करून घेऊ. उद्या इंडिया आघाडीची बैठक आहे. त्यात जो निर्णय होईल, तसा निर्णय आम्ही घेऊ, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे

अदानींचे शेअर तुम्ही पाहिले? जनता मोदींचा थेट संबंध अदानींशी समजत आहे.. जनतेनंच मोदींना नाकारलं आहे. आम्ही ते ज्या पद्धतीनं देश चालवत आहेत त्याचं समर्थन करत नाही हेच जनतेनं पंतप्रधानांना दाखवून दिलं आहे आणि मला या जनतेचा प्रचंड अभिमान वाटतोय, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

यावेळी राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेचं आणि प्रियांका गांधी यांचं कौतूक केलं. Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates

ठाकरेंच्या शिवसेनेला जनतेचा कौल, राज्यात शिवसेना vs शिवसेना लढतीत 8 जागांवर मशाल, शिंदेंना किती जागा?

लोकसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट होत आहेत. राज्यातील नागरिकांनी उद्धव ठाकरे यांना कौल दिला आहे.

लोकसभा निवडणुकांचे निकाल आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत. राज्यात 48 मतदारसंघातील काही मतदारसंघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होती. तर, संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे सेना विरुद्ध सेना यांच्या लढतती जनतेला कौल कोणाच्या पारड्यात पडतो.

सेना विरुद्ध सेना या लढतीत ठाकरेंची सेना वरचढ ठरली आहे. नागरिकांनी उद्धव ठाकरे यांना कौल दिला आहे. या निकालाने शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra Monsoon Update महाराष्ट्राच्या कुठल्या भागात 100 टक्के पाऊस कोसळणार? हवामान विभागाचा अंदाज काय ते बघा

1 thought on “Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live महाराष्ट्रातील भाजपाचे विजयी उमेदवार! पाहा संपूर्ण यादी”

Leave a Comment