Maharashtra News Today 15 जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात? प्रशासनानी दिल्या महत्त्वाच्या सूचना

Spread the love

Maharashtra News Today जुनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा बैठक घेतली आहे.

Maharashtra News Today

Maharashtra News Today सर्वसामान्यांना आता पावसाचे वेध लागले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ९६ ते १०६ टक्के पाऊस होणार. १० ते ११ जुन दरम्यान मुंबईत पावसाची सुरुवात होणार आहे.Maharashtra News Today

१५ जुन पासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊसाला सुरवात होईल. दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळं यंदा सरकारकडून काय उपाययोजना करण्यात येणार आहे

Maharashtra News Today SDRF च्या आठ टीम आहेत त्यांची संख्या वाढवावी. TDRF च्या धर्तीवर महापालीकांनी टीम सुरु कराव्यात आणि विभागनिहाय SDRF च्या टीम तयार कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत. तसंच, बचावकामी स्थानिक तरूण ताबडतोब जातात त्यांना प्रशिक्षण आणि आवश्यक साहित्य द्यावेत, अशा सुचनादेखील केल्या आहेत. मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेचा महाव्यवस्थापकांनी मॉन्सूनसाठी केलेल्या तयारीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे Maharashtra News Today

Maharashtra News Today
Credit to NDTV

SSC Board च्या परीक्षेत नापास झालेल्या मुलाचा पालकांनी असा वाढवावा आत्मविश्वास, करा 5 गोष्टी

Maharashtra News Today दहावीचा निकाल सोमवारी लागला. या निकालात अनेकांना भरघोस यश मिळालं तर काहींच्या पदरी निराशा आली. अशावेळी मुलांच खच्चीकरण होऊ नये म्हणून सांगाव्यात 5 गोष्टी

भारतीय समाजात मुलांचं कतृत्व हे त्यांच्या बोर्डातील परीक्षांच्या निकालावर अवलंबून असतं. वर्षानुवर्षे ही परंपरा, हा विचार समाजात रुजवला जातो. शेजारच्या मुलाला किती गुण मिळेल किंवा आपलं मुलं त्याचे मार्क्स कमी आले, कसं नापास झालं यावर पालक कायमच तुलनात्मक चर्चा करतात.

अशावेळी मुलाच्या मनाचा आणि त्याच्या भावनांचा विचार केला जात नाही. जर आपलं मुलं कोणत्या कारणाने परीक्षेत नापास झालं. तर त्याच्यावर न रागावता, न चिडता काही गोष्टी ठरवून करणे गरजेचे आहे

कोणती गोष्ट कठीण वाटली

जर तुमचं मुलं परीक्षेत नापास झालं तर त्याला ओरडण्यापेक्षा त्याच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. परीक्षेत नेमकी त्याला कोणती गोष्ट कठीण वाटलं. मुलाशी मोकळेपणाने संवाद साधून त्याच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्न करा. कारण ही भीती वाढू शकते. ज्याचा भविष्यात दुष्परिणाम होईल.

काय सुधारायला हवं

जर तुमच्या मुलाला परीक्षेत कमी टक्के मिळाले किंवा ते नापास झालं तर ही गोष्ट सुधारण्यासाठी काय करावे, हा प्रश्न मुलालाच विचारा. कारण यामुळे मुलामध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. एवढंच नव्हे तर यामुळे मुलं देखील आपल्या अपयशावर, आपलं नेमकं काय चुकलं यावर दोन वेळा विचार करेल.

प्रवास चालू आहे

परीक्षेत मुलाच्या अपयशामुळे त्याच्या आत्मविश्वासालाही धक्का बसतो, ज्यातून सावरणे प्रत्येक मुलासाठी सोपे नसते. त्यामुळे परीक्षेत नापास झालेल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा प्रवास संपलेला नसून आता नव्याने चांगल वेळ आली आहे, हे तुम्ही त्यांना सांगावे.

अपयश हेच सर्वस्व नाही

जर तुमचा मुलगा परीक्षेत नापास झाला असेल तर त्याला काळजी करू नका असा सल्ला द्या कारण अपयश कधीही त्याच्या भविष्याचा मार्ग मोकळा करत नाही. अडखळल्यानीच माणूस शहाणा होतो आणि ज्यांनी आयुष्यात अनेक अपयश पाहिले त्यांनाच यशाची चव कळते.

नाराज न होणे

जर तुमचा मुलगा परीक्षेत नापास झाला असेल किंवा त्याचे मार्क्स कमी असतील तर यावर तुमची नाराजी व्यक्त करण्याऐवजी त्याला सांगा की तुम्ही त्याच्यावर नाखूश नाही आणि तुम्ही कधीच असू शकत नाही. यामुळे मुलांमधील हरवलेला विश्वास पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि त्यांच्यात नवा उत्साह निर्माण होईल.

पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास होणाल जलद आणि आरामदायी; मेट्रो-3 लवकरच सुरू होणार, नवी तारीख आली समोर

मुंबई मेट्रो 3 प्रकल्पासंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. मुंबई मेट्रोमुळं नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे

मुंबई शहरात आणखी एक मेट्रो सेवा सुरू होत आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. तसंच, मुंबईकरांना भूमिगत मेट्रोमध्ये प्रवास करता येणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो 3 कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यावर मेट्रोची एकात्मिक चाचणी प्रक्रिया पूर्ण केली आहे.

त्यानंतर आता लवकरच संशोधन डिझाइन आणि RDSOची चाचणी सुरू होणार आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर जुलै महिन्यात मुंबई मेट्रो 3 सुरू होण्याची शक्यता आहे. या मेट्रोमुळं प्रवाशांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे.

एमएसआरसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोची पहिली चाचणी पार पाडल्यानंतर मेट्रोची चाचणी घेण्यासाठी मेट्रो रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्डस ऑर्गनायझेशन (RDSO)कडे अर्ज पाठवण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यातील आरडीएसओ चाचणी जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यावेळी मेट्रोचा वेग, यंत्रणा, सुरक्षा आणि रोलिंग स्टॉक तपासला जाणार आहे. RDSOकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अंतिम CRS चाचणीसाठी अर्ज केला जाणार आहे. जुलैपर्यंत सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Maharashtra State Board Class 10 exam results

Leave a Comment