Maharastra Politics भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका, अजितदादांना टेन्शन

Spread the love

भुजबळांच्या मनात नेमकं काय आहे याची चर्चा सध्या सुरू आहे. कारण मागच्या काही दिवसांमधील भुजबळांची (Chhagan Bhujbal) वक्तव्य ही महायुतीच्या विरोधातील आणि मविआला पाठिंबा दर्शवणारी आहेत.

Maharastra Politics

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भूजबळ (Chhagan Bhujbal) यांची मागल्या काही दिवसांमधली ही वक्तव्य चर्चेत आहेत. या वक्तव्यांवरून भुजबळांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे.

Maharastra Politics भुजबळांची मागील काही दिवसांमधली बरीचशी विधानं ही महायुतीच्या विरोधातली आहे. विधानसभेसाठी 90 जागांची मागणी, मनुस्मृतीवरून झालेला वादात आव्हाडांची (Jitendra Awhad) केलेली पाठराखण यासारख्या अनेक विषयांवर भुजबळांनी केलेली विधानं महायुतीच्या भूमिकेशी विसंगत आहेत.

भुजबळ काय म्हणाले बघा

काय समज द्या, समज द्या, असं लावलंय. मी माझ्या पक्षात बोलणारच. मी जागावाटपाचा मुद्दा माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत मांडला होता. मी आता मीडियासमोर बोलणार नाही. मात्र मला जे काही सांगायचं असतं, ते मी पक्षाला सांगेन. आम्ही महायुतीमध्ये येताना भाजप नेते काय बोलले होते, त्याची आठवण फक्त मी त्यांना करुन दिली, असं म्हणत भुजबळांनी आपली भूमिका मांडली होती

Maharastra Politics मनुस्मृती प्रकरणावरुन बाबासाहेबांचा फोटो फाडल्यापकरणी आव्हाड यांच्याकडून अनवधानाने चुक झाली. त्याची त्यांनी माफीही मागितली. त्यामुळे त्यावरुन विनाकरण राजकारण करु नये, असं म्हणत आव्हाडांची पाठराखण केली होती.

Maharastra Politics अमित शहांनी लोकसभेला नाव सुचवूनही उमेदवारी मिळाली नाही आपली अवहेलना झाल्याचं म्हणत भुजबळ यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत नाराजी व्यक्त केली.

तर उद्धव आणि पवारांबद्दल जनतेमध्ये सहानुभूती असल्याचं म्हणत भूजबळ यांनी महायुतीमध्ये बॉम्ब टाकला होता. तर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांनाही टोला लगावला होता. त्यामुळे अनेकांचा भूवया उंचावल्या होत्या. तर होर्डिंग प्रकरणात त्यांनी उद्धव ठाकरेंची बाजू घेतली होती.

छगन भुजबळांची ही वक्तव्य विचार करायला लावणारी आहेत. भुजबळ जरी आपण नाराज नसल्याचं सांगत असले तरी त्यांच्या मनात काय चाललंय हे सांगायला राजकीत पंडितांची गरज नाहीय. समझने वालों को इशारा काफी है, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही


Maharashtra Lok Sabha Exit Poll 2024 Results एक्झिट पोलचे अंदाज कधी आणि कुठे तपासायचे लाइव्ह स्ट्रीमिंग

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल सार्वत्रिक निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा संपल्यानंतर लगेचच जाहीर होणार आहेत. सध्या 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशात मतदान सुरू आहे.


लोकसभेचा रणसंग्राम कोण जिंकणार? आज संध्याकाळी येणार एक्झिट पोलचे निकाल

Maharastra Politics
Credit To Udaipur Kiran

Maharastra Politics देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली आहे. लोकसभा निवडणुकीसह 4 राज्यातील विधानसभा निवडणुकाही झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी आज सातव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहेत. सातव्या टप्प्यात देशातील 7 राज्यं आणि एका केंद्राशासित प्रदेशातील 57 जागांवर मतदान होत आहे.

मतदानाचा हा अखेरचा टप्पा असून यानंतर थेट निकालाची प्रतिक्षा असणार आहे. 4 जूनला मतमोजणी होणार असून, यानंतर देशात सलग तिसऱ्यांदा भाजपाचं सरकार येणार की काँग्रेस बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातील 48 जागांवर नेमका काय निकाल असेल याचीही प्रचंड उत्सुकता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर होणारी ही पहिली मोठी निवडणूक असल्याने महाराष्ट्राची जनता काय कौल देते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे

Maharastra Politics निकालाचा अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल आज संध्याकाळी समोर येणार आहेत

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएचा मोठा विजय होईल अशी भविष्यवाणी केली आहे. पण त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील युती 400 चा आकडा पार करु शकणार नाही असं म्हटलं आहे. तर योगेंद्र यादव यांनी भाजपाला 240 ते 260 जागा मिळतील असं म्हटलं आहे. तर एनडीएला 35 ते 45 जागा मिळतील असं म्हटलं आहे.

काँग्रेसने एक्झिट पोलवर बहिष्कार टाकला आहे

Maharastra Politics आज संध्याकाळी सर्व टीव्ही चॅनेल्सवर एक्झिट पोलचे निकाल दाखवले जातील. तसंच त्यावर चर्चाही होतील. काँग्रेस या चर्चांमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे

भारतात 1957 मध्ये दुसऱ्या सार्वजनिक निवडणुका झाल्या होत्या. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपनिअने तेव्हा एक्झिट पोल केला होता. हा भारताचा पहिला एक्झिट पोल होता. यानंतर 23 वर्षं कोणताही एक्झिट पोल झाला नाही

एक्झिट पोलचा नियम काय असतो?

रिप्रेजेंटेशन ऑफ पिपल्स अॅक्ट 1951 नुसार जोपर्यंत सर्व टप्प्यातील मतदान पार पडत नाही तोपर्यंत एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले जाऊ शकत नाहीत. जर एखाद्याने या नियमाचं उल्लंघन केलं तर त्याला 2 वर्षांची कैद किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते.


Jarange Patil News आरक्षणाची अधिसूचना लागू करा अन्यथा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करू: जरंगे-पाटील

1 thought on “Maharastra Politics भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका, अजितदादांना टेन्शन”

  1. Pingback: Mumbai Mosoon

Leave a Comment