Monsoon Update काही भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालीय. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सून गोव्यात दाखल झाला असून तो 8 – 9 जूनपर्यंत मुंबईत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. Monsoon Update
Monsoon Update
Monsoon Update दमटपणा आणि उष्णतेने त्रस्त मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईपाठोपाठ मुंबईच्या काही भागात मान्सूनपूर्व पाऊस सुरु झालाय. उपनगर आणि शहराच्या काही भागात पावसाची नोंद झाली असून काही ठिकाणी पहाटेच्या सुमारास चांगला पाऊस झालाय. आज मुंबईतील वातावरण ढगाळ असणार असून काही ठिकाणी पाऊस बरसणार आहे. तर मुंबईकरांनी छत्री घेऊन घराबाहेर पडावं Monsoon Update
Monsoon Update हवामान विभाग आणि बीएमसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायनमध्ये सर्वाधिक 33 मिमी, दादरमध्ये 29 मिमी, वडाळ्यामध्ये 27 मिमी, ओशिवरामध्ये 26 मिमी, चेंबूरमध्ये 20 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय. याशिवाय अंधेरीमध्ये 12 मिमी, जुहूत 9 मिमी, कांदिवली अग्निशमन केंद्रात 9 मिमी, घाटकोपर आणि बीकेसीमध्ये 5 मिमी, तर मागाठाणेमध्ये 2 मिमी पाऊस बरसलाय. मुंबईच्या इतर भागातील लोक अजून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. Monsoon Update
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. फडणवीसांनी हे वक्तव्य का केलं, त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? अशी चर्चा आता सुरु झाली आहे
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या दारूण पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) स्वीकारली. उपमुख्यमंत्रीपदाचा (DCM) राजीनामा देण्याचे संकेतही त्यांनी दिले. विधानसभेच्या तयारीसाठी सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती त्यांनी भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वाला केलीय. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) एकच खळबळ उडालीय. फडणवीसांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? त्यांनी नेमका कुणाला इशारा दिलाय? अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झालीय. फडणवीसांचं हे वक्तव्य म्हणजे भाजप नेतृत्वावर व्यक्त केलेली नाराजी आहे, असा अर्थ काढला जातोय
2019 मध्ये फडणवीस एकहाती निर्णय घेत होते. मात्र आता त्यांना महाराष्ट्रात निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य पक्ष नेतृत्वानं दिलेलं नाही. याउलट महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्या नेत्यांना झुकतं माप दिलं जातंय. राज्यसभा उमेदवार ठरवताना फडणवीसांना विश्वासात घेण्यात आलं नाही. पक्ष सोडून गेलेल्यांसाठी पुन्हा लाल गालिचे अंथरण्यात आले. फडणवीसांना उपमुख्यमंत्री केल्यानं चुकीचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला
एवढं होऊनही लोकसभा निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीसांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. भाजप उमेदवारांसाठी सर्वाधिक जाहीर सभा घेतल्या. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर वाराणसीतही पंतप्रधान मोदींसाठी फडणवीसांनी प्रचार केला. आता विधानसभा निवडणुकीसाठीही सर्व शक्तीनिशी उतरणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय..
अवघ्या पाच-सहा महिन्यांवर विधानसभा निवडणुका लागणार आहेत. भाजपला महाराष्ट्रात पुन्हा एकदा नंबर वन पक्ष बनवायचं फडणवीसांचं ध्येय आहे. त्यामुळंच सरकारमधून मोकळं करण्याची त्यांची विनंती भाजपचं केंद्रीय नेतृत्व मान्य करणार का, याकडं गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांचं लक्ष असणाराय.
फडणवीसांनी राजीनामा देण्याची तयारी केल्यानंतर भाजपमधला वादही चव्हाट्यावर आलाय. भाजप नेते मोहित कंबोज यांनी महाराष्ट्र तसंच मुंबईतल्या भाजप नेत्यांवर निशाणा साधलाय. एका माणसाची लाईन छोटी करण्याच्या नादात सगळ्या पक्षाचं नुकसान झालं आहे. आता याची जबाबदारी कोण घेणार? महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी ही जबाबदारी घ्यायला हवी, अशी पोस्ट मोहित कंबोज यांनी केलीय. तर फडणवीसांचं हे विधान म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा देण्यासाठी असल्याचा मोठा दावा संजय राऊत यांनी केलाय
आता फडणवीसांचा राजीनामा केंद्रीय नेतृत्त्व मान्य करणार का… की भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर फडणवीस आपला निर्णय बदलणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय
ना मुंडे ना महाजन, महाराष्ट्रात भाजपचं कमळ रुजवणाऱ्या पर्वाचा अस्त?
महाराष्ट्रात मुंडे आणि महाजन ही भाजपमधील दोन दिग्गज घराणी.. मुंडे महाजनांनंतर त्यांच्या मुली संसदेत होत्या.. मात्र 2024 च्या निवडणूकीत मात्र या दोन्ही कुटुंबातील कोणाही संसदेत नसणार आहे
राज्यात भाजपला तळागाळात आणि घराघरात पोहोचवण्याचं काम केलं ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी… मुंडे महाजन बोलतील तो महाराष्ट्र भाजपमध्ये अंतिम शब्द होता. महाजन कधी राज्यसभेत तर कधी लोकसभेत निवडून गेले. तर गोपीनाथ मुंडे 2014 ला लोकसभेत निवडून गेले. गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती निधनानंतर त्यांची कन्या प्रीतम दोन वेळा लोकसभेवर निवडून गेल्या. मात्र 2024 मध्ये मुंडे महाजन कुटुंबातील कोणीही सदस्य संसदेत नसणार आहे
मुंडे आणि महाजन यांच्या निधनानंतर त्यांच्या लेकींनी विजय साकारत आपले पारंपरिक मतदारसंघ राखले होते. मात्र यंदा प्रीतम मुंडे यांच्याऐवजी भाजपने बीडमधून पंकजांना उमेदवारी दिली. तिथे पंकजा मुंडेंना पराभव स्विकारावा लागला. तर पूनम महाजन यांचं तिकीट कापत भाजपने उत्तर मध्य मुंबईमधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती
1 thought on “Monsoon Update मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात, ‘या’ तारखेला मान्सून होणार दाखल”