Rain News Maharashtra महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती झाला पाऊस? आज कसं असणार हवामान?

Spread the love

Rain News Maharashtra सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात जोरदार पावसानं (Rain) हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं

Rain News Maharashtra

Rain News Maharashtra राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. पावसासाठी सर्वत्र पोषक वातावरण (Weather) तयार झालं आहे. दरम्यान, सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात जोरदार पावसानं (Rain) हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आत्तापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झाला? पाहुयात याबाबतची माहिती.

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस होणार ?

Rain News Maharashtra हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या विविध जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. विशेषत: पुण्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. यामुळं पुण्यातील जनजीव पहिल्याच मोठ्या पावसात विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.

Rain News Maharashtra रत्नागिरी – 107.4

सातारा – 61

धाराशीव – 57.4

बारामती – 51.2

नांदेड – 20.8

सांगली – 19.3

ठाणे -19.4

उदगीर – 47

सोलापूर – 11.6

कोल्हापूर – 16.9

माथेरान – 32.4

अहमदनगर -19.8

मुंबई – 19.8

Rain News Maharashtra
Credit To Times Now

राज्यात आज कुठं पडणार पाऊस?

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. आज कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तसेच सिंदुधुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीव नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

राज्यात पावसाचा धुमाकूळ, सकाळपासून मुसळधार, सिंधुदुर्गाला रेड अलर्ट, विदर्भाला यलो अलर्ट

राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

Rain News Maharashtra राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, कोकण, विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाला. तर पुणे शहरात देखील ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. राज्यातील इतर भागात देखील येत्या 2 दिवसात वरुणराजाचे जोरदार आगमन होणार आहे. याबाबत इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 48 तासांत मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. सिंधुदुर्गाला आज रेड अलर्ट देण्यात आलाय. तर संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत पावसाची संततधार

आज पहाटेपासून मुंबईत ठीकठिकाणी पावसाने हजेरी लावली. दादर, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, कुलाबा, वांद्र्यात पावसाने हजेरी लावली. पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात पाऊस कोसळला. पुढील 3-4 तास मुंबईत पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात मध्य आणि मोठ्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज आहे. तर तशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं हवामान खात्याने आवाहन केलेय.

रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे लोकलवर परिणाम

Rain News Maharashtra मध्य रेल्वेवरील लोकल 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहे. अंबरनाथ दरम्यान सिग्नल बिघाड झाल्याने आणि सर्वत्र रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे लोकलवर परिणाम झाला आहे. तुर्तास सिग्नलमध्ये झालेला तांत्रिक बिघाड मध्य रेल्वेकडून दुरुस्त करण्यात आला आहे

पुणे शहर परिसरात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

पुणे शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. तरी प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाययोजना करण्याच्या तसेच पावसात अडकलेल्या नागरीकांना मदत करुन पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या

पुण्यात शनिवारी सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे काही भागात पाणी साचले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, याची तातडीने दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून या विषयीची माहिती घेतली. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच विस्कळीत झालेली वाहतुक तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. या काळात नागरीकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. नागरीकांनी काळजी घ्यावी. तसेच येत्या पाच दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत

Rohit sharma पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वीच सरावादरम्यान रोहित जखमी; टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

1 thought on “Rain News Maharashtra महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती झाला पाऊस? आज कसं असणार हवामान?”

Leave a Comment