Rohit sharma पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वीच सरावादरम्यान रोहित जखमी; टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

Spread the love

Rohit sharma टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपच्या मिशनची सुरुवात आयरलँडविरूद्धच्या सामन्याने केली. हा सामना टीम इंडियाने जिंकला आणि आता भारत पुढच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे

Rohit sharma

Rohit sharma टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून 9 जून रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहतायत. मात्र यावेळी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी म्हणजे रविवारी होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याचं समोर आलंय. यावेळी रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाल्याची माहिती आहे

Rohit sharma टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपच्या मिशनची सुरुवात आयरलँडविरूद्धच्या सामन्याने केली. हा सामना टीम इंडियाने जिंकला आणि आता भारत पुढच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. मात्र याच सामन्यापूर्वी रोहित शर्मा जखमी झाल्याचं समोर आलंय.

रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत

Rohit sharma भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू नेटमध्ये सराव करत होते. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत होता. पण नेटमध्ये फलंदाजी करताना एक बॉल त्याच्या अंगठ्याला लागला. त्यानंतर हिटमॅन काहीसा अस्वस्थ दिसत होता. दरम्यान अंदाजानुसार, रोहितची ही दुखापत फारशी गंभीर नाहीये. याचं कारण म्हणजे दुखापतीनंतर काही काळानंतर त्याने पुन्हा फलंदाजीचा सराव सुरू केला.

Rohit sharma

Rohit sharma शुक्रवारी केंटिज पार्कवर नेटमध्ये सराव करत असताना रोहितच्या डाव्या हाताच्या ग्लोव्हमध्ये बॉल लागला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातही रोहितच्या खांद्याला बॉल लागला होता. त्यानंतर तो सामना अर्धवट सोडून गेला. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यापूर्वी तो सरावासाठी आला होता. श्रीलंकेचा थ्रोडाउन स्पेशालिस्ट नुवान त्याला बॉल टाकत होता. अचानक चेंडू उसळला आणि त्याच्या ग्लोव्ह्जला लागला. यावेळी खूप वेदना होत होत्या. तातडीने फिजिओ त्याची तपासणी केली आणि त्याने पुन्हा सराव सुरू केला

टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

Rohit sharma रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची ऐतिहासिक कामगिरी; तिसऱ्यांदा घेतली ‘अवकाशभरारी

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केली आहे. सुनीता विल्यम्स अंतराळातील चाचणी मोहिमेवर नवं अंतराळयान उडवणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या आहे. 58 वर्षीय सुनीता विल्यम्स यांनी 5 जून रोजी फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हरल येथून नासाचे अंतराळवीर बॅरी ‘बुच’ विल्मोर यांच्यासोबत बोइंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केलं.

बोईंग क्रू फ्लाईट टेस्ट (CFT) नावाचं मिशन नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम म्हणून सुरू करण्यात आलं आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर नियमित क्रू फ्लाईटसाठी स्टारलाइनर प्रमाणित करण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. हे मिशन यशस्वी झाल्यास, ते अंतराळवीरांना कक्षेतील प्रयोगशाळेत आणि तिथून नेण्यासाठी स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगननंतरचं स्टारलायनर हे दुसरं खाजगी अवकाशयान बनवेल

कायदा मोडणाऱ्या परवानगी नाकारणाऱ्यांना आपण मानत नाही -जरांगे

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे आंदोलनावरती ठाम, आंदोलनाचा अधिकार घटनेने दिला असून परवानगी नाकारणाऱ्यांना मी मानत नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

(Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी (Prime Minister) विराजमान होणार आहेत. रविवार, 9 जून 2024 रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीची (Swearing Ceremony) तारीखही ठरली असून 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली.

9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे, असंही जोशी यांनी जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यासाठी जमलेल्या एनडीए नेत्यांना सांगितलं आहे

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मंत्रिमंडळ स्थापनेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या नवनिर्वाचित खासदारांची शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठर पार पडली. एनडीएच्या खासदार, मुख्यमंत्र्यांसह युतीचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा मोदींच्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ ठराव मांडण्याची अपेक्षा आहे, मित्रपक्ष आणि खासदारांनी त्यास अनुमोदन देण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis यांनी राजीनामा दिल्यास गिरीश महाजन उपमुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Lok Sabha Election Exit Poll 2024) समोर आले असून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एनडीला (NDA) 350 हून अधिक जागा मिळणार असून महायुतीला राज्यात फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात महायुतीला (Mahayuti) 22 ते 26 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 23 ते 25 जागांचा अंदाज आहे. यावर आता मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, विविध सर्वे समोर आले आहेत. या सर्वेमध्ये मोदी जी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतीलच, असे दाखविले जात आहेत. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान तर होणारच आहे. शिवाय आम्ही सांगितल्याप्रमाणे चारशे पार सुद्धा करणार आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Weather update Maharashtra News महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 24 तास महत्त्वाचे, IMD कडून हवामानाबाबत मोठी बातमी

Leave a Comment