Unseasonal Rain: विदर्भात अवकाळी पावसाचा जोर कायम; पुढील पाच दिवस नागपूरसह सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी

Spread the love

Unseasonal Rain: आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

Unseasonal Rain:

Unseasonal Rain: आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. राज्यात एकीकडे उष्णतेचा (Heat) पारा तापत असताना विदर्भात मात्र सलग पावसाची हजेरी लागताना दिसत आहे. अशातच आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

Credit by The Economic Times

Unseasonal Rain:तर आज नागपूर, वर्धा, वाशिम, बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तर हा यलो अलर्ट पुढे 22 मे पर्यंत कायम राहणार आहे. संभाव्य इशारा लक्षात घेता शेतकर्‍यांसह नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आल्या आहेत

Unseasonal Rain:

मिरची उत्पादकांना अवकळी पावसाचा फटका

भंडारा जिल्ह्यात धान पीक हे मुख्य उत्पादन असलं तरी आता नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी बागायती शेतीच्या माध्यमातून मिरचीचं उत्पादन घेऊ लागले आहेत. मागील आठवड्यात भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलं. या अवकाळी पावसामुळं भात पीक जमीनदोस्त झालंच तर, पालेभाज्यांच्या शेतीलाही मोठा फटका बसलाय. सोबतच मिरची पिकांचेही मोठे नुकसान झाल्याचं चित्र भंडारा जिल्ह्यात बघायला मिळतंय

शेतात जमीनदोस्त झालेल्या भात पिकांना अंकुर

गेल्या दोन आठवड्यापासून भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे कापणीला आलेले भातपीक जमीनदोस्त झाले आहे. तर काही ठिकाणी कापून ठेवलेला भातपीक पावसात सापडल्यानं ओले झाले आहे. या घटनेला आता आठवडा लोटला असला तरी, आजही अनेकांच्या शेतात अवकाळीचे पाणी साचून आहे. परिणामी अनेकांची मळणी रखडली आहे. या अवकाळी पावसानं शेतकरी पुरता हतबल झाला असून आर्थिक विवंचनेत अडकला आहे. आता तर, आठवड्यापासून भातपीक पाण्यात असल्यानं शेतातच जमीनदोस्त झालेल्या भात पिकांना अंकुर फुटल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

मान्सूची चाहुल 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीस मनाई, नौकांना समुद्रात जाण्यास बंदी

महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. अशी माहिती मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार यांनी दिली आहे.

ज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याचं चित्र गेल्या आठवड्यात पाहायला मिळालं. राजधानी मुंबईतही (Mumbai) सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी, घाटकोपमध्ये महाकाय बॅनर कोसळून दुर्घटनाही घडली. तर, अद्यापही पुढील 2 दिवसांसाठी अनेक जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. आता, मान्सूनपूर्व (Monsoon) पाऊसानंतर यंदा लवकरच मान्सूनची हजेरी लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे, पावसाळ्याच्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे.

मच्छिमारी सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक, सभासद व अन्य संबंधितांना महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी 01 जून ते 31 जुलै 2024 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. अशी माहिती मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार यांनी दिली आहे

Manoj Jarange Patil : आता फक्त पाडा म्हणालो, विधानसभेला नाव घ्यावं लागेल; मनोज जरांगे आक्रमक

1 thought on “Unseasonal Rain: विदर्भात अवकाळी पावसाचा जोर कायम; पुढील पाच दिवस नागपूरसह सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी”

  1. Pingback: Weather Updates

Leave a Comment