Maharashtra Heat Wave: महाराष्ट्रात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावा लागत आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे
Maharashtra Heat Wave:
महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेने उच्चांक गाठला आहे. त्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या अडीच महिन्यांत दररोज सरासरी ३ जण उष्माघाताचे बळी ठरले. यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आली असून पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांतील लोक उन्हाच्या कडाक्याने त्रस्त झाले. यावर्षी १ मार्च ते १४ मे पर्यंत म्हणजेच गेल्या ७४ दिवसांत २४१ जण उष्माघाताचे बळी ठरले.
राज्यांत अनेक भागात उष्णता कायम
रुग्णालयात योग्य उपचार मिळाल्याने कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. पुढील १५ ते २० दिवस लोकांना उन्हापासून आणि उष्णतेपासून वाचवावे लागणार आहे. जूनमध्ये मान्सून सुरू झाल्याने दिलासा मिळेल. मुंबईसह राज्यातील अनेक भागात अजूनही तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे.
Maharashtra Heat Wave: आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार जालन्यात उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. जालन्यात आतापर्यंत २८ जण उष्माघाताचे बळी ठरले आहेत. त्यानंतर नाशिक- २७, बुलढाणा- २१, धुळे- २०, सोलापूर- १८ आणि नागपूरमध्ये ११ जण उष्माघाताचे बळी ठरले आहेत.
उन्हात किंवा कडक उन्हात काम केल्यावर चक्कर येत असेल किंवा मळमळ होत असेल तर ही उष्माघाताची लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत औषध घेण्याबरोबरच विश्रांती घ्यावी. ताप कितीही वाढला तरी पाण्याचे सेवन कमी होऊ देऊ नका.
एमएमआरमध्ये उष्माघाताची प्रकरणे आढळून आली आहेत, परंतु मुंबईत अद्याप उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात उष्माघाताचे दोन, रायगडमध्ये दोन आणि पालघरमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे.
राज्यत कोठे राहणार उष्णतेची लाठ अन कोठे वादळी वारे आणि पाऊस
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, कोकण, मुंबई-ठाणे, पालघर आणि रायगड येथे उष्णतेच्या लाटेप्रकरणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Heat wave:
राज्यात सध्या उन-पावसाचा खेळ सुरु आहे. कुठे अंगाची लाहीलाही करणारं उन्ह तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागतो आहे. त्यात आता राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. तर, कोकण, ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर येथे उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस उत्तर कोकण, दक्षिण मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ वगळता इतर राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. इतर ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी ४० ते ५० किलोमीटर प्रति वेगाने वाऱ्यासह पाऊस पडणार असा अंदाज आहे.
1 thought on “Maharashtra Heat wave: महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद”