Maharashtra Lok Sabha Elections 2024 Nivadnuk LIVE: तुमचे मत,आणि तुमचा विश्वास ; मतदान सुरू होताच पंतप्रधान मोदींचे मराठीत ट्विट केले आहेत

Spread the love

Maharashtra Lok Sabha Elections 2024 Nivadnuk LIVE: तुमचे मत,आणि तुमचा विश्वास ; मतदान सुरू होताच पंतप्रधान मोदींचे मराठीत ट्विट केले आहेत

 Maharashtra Lok Sabha Elections 2024 Nivadnuk LIVE:

Maharashtra Lok Sabha Elections 2024 Nivadnuk LIVE: या लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होत आहेत.आणि पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. देशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या टप्प्यात आज अनेक दिग्गज नेत्यांचे आपले भवितव्य पणाला लागणार आहे. आजच्या मतदानाचे माहिती मिळवा.

Maharashtra Lok Sabha Elections 2024 Nivadnuk LIVE: तालुक्यातील मौजे टाकळी येथे एक तास ईव्हीएम मशीन ठप्प झाले आहे.

टाळकी येथें मतदान सुरू झाल्यानंतर एक मत घेण्यात आले मात्र त्यानंतर लगेच मशीन बंद पडली. तासाभरापासून मशिन बंद असल्याने मतदारांची वाट लागली आहे. पर्यायी मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे

बिहारमध्ये लोकसभेच्या पाच जागांसाठी मतदान सुरु आहे

Maharashtra Lok Sabha Elections 2024 Nivadnuk LIVE: बिहारमधील पाच लोकसभा मतदारसंघांसाठी शुक्रवारी सकाळपासूनच मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त सुरू झाला. किशनगंज, कटिहार, पूर्णिया, भागलपूर आणि बांका येथे सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले

आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने TOI ला सांगितले. पाच मतदारसंघातील 45.15 लाख महिला आणि 306 तृतीयपंथींसह 93 लाखांहून अधिक मतदार तीन महिलांसह 50 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

Maharashtra Lok Sabha Elections 2024 Nivadnuk LIVE: अमरावती शहरातील रुक्मिणीनगर शाळा क्रमांक 19 मध्ये ईव्हीएममध्ये बिघाड

आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून अमरावतीत आज मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडत आहेत. मात्र, अमरावती शहरातील रुक्मिणीनगर शाळेतील मनपा शाळा क्रमांक १९ मध्ये मतदान सुरू होताच एका खोलीतील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने अर्धा तास मतदान प्रक्रिया विस्कळीत झाल्याचे चित्र होते.

Maharashtra Lok Sabha Elections 2024 Nivadnuk LIVE: या वर्षी मतदानावर अवकाळी पाऊस

अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 1 हजार 983 मतदान केंद्रे असणार आहेत. अमरावतीमध्ये ३७ उमेदवार रिंगणात असून भाजपच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे आणि प्रहारचे दिनेश बुब यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे आजच्या मतदानाचा वेग मंदावत असल्याचे दिसून येत आहे.

Kalki 2898 AD Movie

Leave a Comment